जिरो बजट नैसर्गिक / आध्यात्मिक शेती. कृषि ऋषि सुभाष पाळेकर
झिरो बजेट म्हणजे काय?
मुख्य पिकाचा उत्पादनखर्च आंतरपिकाच्या उत्पनातुन भरून काढणे व मुख्य पिक बोनस म्हणून घेणे होय.
ज्या निविष्ठा आपण घरी तयार करणार आहोत त्या वस्तुंचा वापर केल्याने जीव, जमीन, पाणी, पर्यावरण या नैसर्गिक संसाधनांचे नुकसान होणार नाही अशा तऱ्हेने निर्माण करायचे आहेत
देशी गाईच्या १ ग्रॅम शेणात 300 कोटी जिवाणू आहेत तर गोमुत्रात संजिवके, नायट्रेट्स, खनिजे आहेत..
ह्युमस:- जमिनीत जेवढी सुपिकता जास्त तेवढे पिकाचे उत्पादन जास्त. जामिनीची सुपिकता वाढविणारे एक जैविक रसायन (Bio Reactor) जमिनीत असते त्यालाच ह्युमस असे म्हणतात. ह्युमस म्हणजेच सुपिकता.
काष्ट पदार्थ:- प्रत्येक सजिवाचे मेलेले शरीर म्हणजेच काष्ट. पिकाचे आयुष्य संपल्यानंतर उपलब्ध होणारे पिकांचे अवशेष म्हणजे काष्ट. मानवाचे मरून वाळलेल शरीर, प्राण्यांचे मरून वाळलेले शरीर जीवजंतुचे मरून वाळलेले शरीर म्हणजेच काष्ट पदार्थ होय
आध्यात्मिक शेती म्हणजे काय?
पिकांच्या किवा फळझाडांच्या वाढीसाठी आणि ईच्छित उत्पादन मिळविण्यासाठी ज्या ज्या अन्नद्रव्यांची किंवा निविष्ठांची आवश्यकता असते त्या त्या निविष्ठांचा किंवा अन्नद्रव्यांचा पुरवठा झाडांना किंवा पिकांना मानव करणार नाही तर ईश्वर करेल त्याला आध्यात्मिक शेती म्हणतात.
अध्यात्म:- मानवाला निसर्गाच्या माध्यमातुन ईश्वराशी जोडणे म्हणजे अध्यात्म होय.
* कृषि ऋषि सुभाष पाळेकरांचे ज्ञानरूपी विचार *
जिरो बजट नैसर्गिक शेतीचे ४ प्रमुख तत्व ...
01)आच्छादन 2) वाफसा 3) बीजामृत 4) जीवामृत
01) आच्छादन
आच्छादनाचे ५o चमत्कार...... १) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो. २) पाण्याची ५०% बचत होते. ३) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते. ४) जमिनीची सुपिकता वाढते. ५) जमिनीचा पोत वाढतो. ६) हवेतील ओलावा ओढून घेते. ७) नत्र उपलब्ध होते. ८) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो. ९) सजिवता वाढते. १०) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते. ११) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते. १२) जमिनीत नविन घडण होते. १४) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. १५) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो. १६) आंतरकाष्टांगजन्य विघटन. १७) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते. १८) सर्वच जैव रासायनिक क्रिया प्रक्रियांचे नियंत्रण होते. १९) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते. २०) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते. २१) एकदल- द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो. २२) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. २३) मातीची धूप थांबून पाणी जिरते. २४) आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात. २५) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. २६) आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते. २७) जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते. २८) पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो. २९) पिकांत साखरेचे प्रमाण, उत्पादन वाढवते व काष्टांचे उपलब्धता होते. ३०) पिक प्रती पिक उत्पादन वाढतच राहते. ३१) बेण्याची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते. ३२) उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते. ३३) जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो. ३४) जलधारणाशक्ती वाढते. ३५) जमिनीचा सामू नियंत्रित होतो. ३६) खारे पाणी सुसह्य होते. ३७) फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात. ३८) जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते. ३९) जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते. ४०) जमिनीत शक्ती संतुलन बनते. ४१) जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते. ४२) वैश्विक किरनांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते. ४३) पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो. ४४) हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते. ४५) जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते. ४६) जमिनीवरिल वातावरण खेळते राहते. ४७) जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो. ४८) जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते. ४९) जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते. ५०) सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन वापसा स्थितीत राहते.
* कृ. ऋ. श्री पाळेकर गुरूजी *
वाफसा व पाणी व्यवस्थापन
वाफसा
पिकांच्या मुळांना पाणी पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे. तर पिकांच्या मुळींना वाफसा पाहिजे. उदाहरणार्थ दुष्काळी पट्टयात पाऊस नसताना बिना सिंचनाच्या चिंचेच्या झाडाला अमाप चिंचा लागतात.
1. वाफसा म्हणजे काय?
जमिनीत दोन मातीकण समुहा दरम्यान ज्या रिकाम्या पोकळया असतात त्या रिकाम्या पोकळयामध्ये पाण्याच अस्तीत्व अजीबात नको, तर 50% पाण्याची वाफ व 50% हवा ह्यांच संमिश्र पाहिजे. ह्याच स्थीतीला वाफसा म्हणतात.
2. वाफसा घेणारी मुळी कुठे असते?
कोणत्याहि झाडाची दुपारी बारा वाजता जी सावली पडते त्या
सावलीच्या शेवटच्या सिमेवर अन्न आणि वाफसा घेणारी मुळी असते. ती त्या सावलीच्या आत नसते.झाडाच्या मुळीला किती प्रमाणात वाफसा पाहिजे हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुळींचा असतो आपला नसतो.
दुपारी 12 वा. पडणाऱ्या सावलीच्या कडेला जर अन्न व वाफसा घेणारी मुळी आहे, जर आपण सावलीच्या सीमेवर पाणी दिले तर तो निर्णय आपला असतो. अशा स्थीतीत वाफसा होत नाही. परंतु जर आपन सावलीच्या सीमेच्या 6 इंच बाहेर पाणी दिले तर मुळी त्या पाण्यापर्यंत जाते व पाहिजे तेव्हा वाफसा घेते. म्हणुन झाडाच्या सीमेवर पाणी देऊ नये. तर 6 इंच बाहेर नाली काढून पाणी दयावे.
सावलीच्या आतमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाचं पाणी थांबललं किंवा सिंचनाचं पाणी थांबलं तर मुळया सडतात व सडीचे प्रमाण वाढेल. अशा स्थीतीमध्ये झाडाच्या मुळीला फायटोथोरा बुरशी लागते आणि मुळीचं आवरण सडवून टाकते. त्यामुळे वर जाणार अन्न पुरवठा बंद होऊन फांदयांवर झाड सुकायला लागते. परंतु जर आपण सावलीच्या सीमेपासून खोडापर्यंत मातीचा भर दिला व बाहेर उतार काढला तर पावसाचं व सींचनाचं पाणी ताबडतोब बाहेर निघून जाते व मुळया सुरक्षित राहतात.
फायटोथोरा बुरशी प्रचंड नुकसान करते परंतु तिथे नियंत्रण करणारी मित्र बुरशी ट्रायकोडरमा जर आपन जमिनी़ मध्ये उपलब्ध केली तर फायटोथोरा चे नियंत्रन होते. जीवामृतामध्ये ट्रायकोडरमा बुरशीचे जीवाणू असतात. म्हणून जीवामृताचा सतत वापर केला व झाडाच्या खोडाला माती चढवून पाण्याचा उतार बाहेर काढून दिला व सावलीच्या 6 इंच बाहेर सरी काढुन सिंचनाचे पाणी दिले तर फळ झाडावर मर किंवा डिंक्या रोग येत नाही माती चढवल्यावर पावसाचे पाणी निघून जार्इल परंतू जमिनीच्या आत मुळीजवळ अतिरीक्त ओलावा कायम असतो. त्यामुळे सुद्धा रोग निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु जर आपण सीमेच्या 6 इंच बाहेर सरी काढली तर मुळी जवळचा ओलावा नालीत उतरतो व मुळीजवळ वाफसा होतो.
पाणी व्यवस्थापन:-
1. झाडाची हिरवी पाने प्रकाश संश्लेषन क्रियेच्या माध्यमातुन जे अन्न तयार करतात ते खोडामध्ये साठवतात. जर खोडामध्ये 100 किलो अन्न साठवलेले असेल तर त्यापासून आपल्याला 33 किलो धान्याच उत्पादन मिळते किंवा 50 किलो फळाचा, ऊसाच उत्पादन मिळते.याचा अर्थ खोडमध्ये जितका जास्त अन्न साठवला जार्इल तेवढा जास्त उत्पादन मिळेल. म्हणजे पानांनी सगळ तयार केलेल अन्न बुडात साठले पाहिजे त्यासाठी खोडाचा घेर मोठा असला पाहिजे.
2. परंतु जर खोडाचा घेर कमी असेल तर पान अन्न निर्मीती घटवतात. त्यामुळे उत्पादन घटत. जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल तर पानांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने तयार केलेले अन्नसाठा खोडात साठवण्यासाठी खोडाचा घेर वाढवला पाहिजे.
3. खोडाचा आकार तेव्हाच वाढते जेव्हा मुळीचा आकार वाढतो. म्हणजे खोडाचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला मुळीचा आकार वाढवला पाहिजे.
4. मुळीचा आकार तेव्हाच वाढतो जेव्हा मुळीची लांबी वाढते. म्हणजेच मुळीची लांबी वाढवली पाहिजे.
5. मुळींची लांबी तेव्हाच वाढते जेव्हा मुळी पासून पाणी दुर दुर नेल्या जाते. म्हणजे आपल्याला पाणी मुळीपासून दुर दिले पाहिजे.
3) बिजामृत :- १०० किलो बियाण्याला प्रक्रिया करण्यासाठी
१ ) पाणी 20 ली 2 ) देशी गाईचे शेण - ५ किलो 3 ) देशी गाईचे गोमुत्र - ५ली ४ ) कळीचा चुना - ५0 ग्राम ५ ) बांधावरील किंवा जगलातील माती - मुठभर पाण्यात हे सर्व पदार्थ मिसळून चांगले ढवळावे. सावलीत ठेवावे. दिवसातुन 2 वेळा काडीने ढवळावे 2४ तास हे द्रावण ठेवल्यानंतर बिजामृत तयार होते. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
04) जीवामृत (जीवामृत चे फायदे, उपयोग व माहिती)
जीवामृत:- प्रमाण 1 एकर साठी:
200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे.
महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 ली. जीवामृत दयावे.
* * अती महत्वाची टीप:- जीवामृत तयार झाल्या नंतर वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवसच आहे. * *
जिवामृताच्या फवारण्या:-
1. खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर
पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत.
तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत.
शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक.
2. भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी
1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क
3 री फवारणी : दुसऱ्या फव
ारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक
4 थी फवारणी : तिसऱ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत
5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा
150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क
6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक
7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा
200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क
शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसा
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा
200 लि. सप्तधान्यांकुर अर्क
3. नविन फळबागांसाठी: प्रमाण प्रती एकर
1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत
3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात ठेवाव्यात.प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
** जीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी 12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर दयावे. **
फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा:-
पहिल्या वर्षी:- पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड.
व नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड.
दुसऱ्या वर्षी:- प्रती झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड.
तिसरया वर्षी:- प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड.
चौथ्या वर्षी:- प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड.
पाचव्या वर्षी:- प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड.
आणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण कायम राहील.
4. उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक: (वय 5 ते 10 वर्ष)
फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या पाहिजेत .
झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर.
200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले.
ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना फवारणे.
झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
फळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी
प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत.
200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक.
अती महत्वाचे:- जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू असते व संजीवकांची निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी. तसेच कोणत्याही कीटक नाशका (जैविक/नैसर्गिक/रासायनिक) सोबत हे जीवामृत फवारू नये. सर्व उपयुक्त जीवाणू मरून जातील.
जीवामृताच्या फवारण्या का?
1) जीवामृत हे जीवाणूचे विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.
2) कोणत्याही झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्लेषनक्रिये द्वारे सुर्यप्रकाशातून फोटान कणांचा रुपात एका दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच मुळयांनी जमिनीतून घेतलेल्या पाण्याशी व पानांनी घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.५ ग्रॅम अन्न निर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्लेवाट लावले जाते. त्यापैकी काही अन्न मुळयावाटे जमिनीतील जीवाणुंना खाऊ घातल जाते व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतो. काही अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेल अन्न दाण्याचे पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते. किंवा ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25ग्रॅम फळाचे टनेज मिळतं. जेव्हा आपण एक चौरसफुट पानांत 4.५ ग्रॅम अन्न निर्मिती करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळाचं टनेज मिळतं. हा टनेज आपल्याला एक चौरसफुट पानावर जमा होणारी 12.५ कॅलरी सूर्य ऊर्जा होय. म्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेजसुद्धा जास्त मिळेल. पानांचा आकार वाढवणारे हारमोंस जीवामृतामध्ये असतात व जीवामृतांची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो.
3) कधी कधी जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळी जवळच्या सगळया पोकळया पाण्यांन भरतात त्यामुळे पोकळयांमधील हवा निघून जाते व जीवाणूंना
व मुळयांना प्राण वायू मिळत नाही व पिकं पिवळ पडतात कारण जमिनीतून नत्राचा पुरवठा थांबलेला असतो. अशा वेळी झिरोबजेट नैसर्गिक शेती मध्ये अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवामृतांची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवाणू पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात. एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिजं उपलब्ध करतात.

गोमुत्रात काय असते? नत्र, अमोनिया, स्फुरद, पोटयाश, कँल्शियम, गंधक तांबे लोहमँगनीज सुवर्णक्षार सोडीयम अन्य खनिजे अमोनिया गॅस, मीठ, कार्बोनिक आम्ल, आरोग्यदायी आम्ल, एंझाईम्स संजीवके व जीवनसत्व A B C D E दुभत्या गाईच्या दुधात लकटोज असते. गाईच्या शेणात काय असते? गाईच्या१ किलो शेणात नत्र २० ग्रॅम, पालाश २७ ग्रॅम, स्फुरद ९ ग्रॅम, गंधक ४ ग्रॅम, कल्शियम २८ ग्रॅम, मालीब्डेनम ३ ग्रॅम, मॅग्नेशियम २०० मिली, जस्त २०० मिली ग्रॅम, तांबे २५-३० ग्रॅम, बोरान ३०-४० ग्रॅम कोबाल्ट ३ मिली ग्रॅम व भरपुर भरपूर कोटीच्या संख्येत सर्वच अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारे जिवाणू त्यामुळे देशी गाईच्या शेण-गोमुत्रापासुन जिवामृत बनवुन दिल्यास कशाचीच अपुर्णता राहत नाही आणि केवळ एक गाय हे ३० एकर जमीनीची गरज भागवते. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
02) घनजिवामृत
बऱ्याच वेळा विशेषतः कोरडवाहू शेतात पाण्याची व्यवस्था नसते, शेताच्या जवळपास दुसरी विहिर नसते, अशा स्थितीत शेतात जिवामृत बनविणे शक्य नसते आणि जीवा मृत घरुन शेतात वाहून नेणेही शक्य होत नाही अशा अनेक कारणांनी जीवा मृत वापरणे शक्य होत नाही म्हणून गुरुजींनी त्याला पर्याय म्हणून घनजिवामृत दिलेले आहे .घनजीवामृत जीवामृता एवढेच प्रभावी आहे. ते बनविण्याची प्रक्रिया : -
१ ) एकरी १०० किलो देशी गाईचे, बैलाचे, म्हशीचे, बकरीचे मिसळून किंवा केवळ देशी गाईचे शेण घ्यावे. (जर्सी, होलस्टी नचे अजिबात चालणार नाही.)
२ ) १ किलो गुळ बारिककरावा किंवा १ किलो गोड फळाचा गर घ्यावा किंवा २ लीटर उसाचा रस घ्यावा. यांपैकी कोणतेही एक त्या शेणावर विस्कटून टाकावे.
३ ) त्यावर २ किलो कडधान्याचे बेसन विस्कटून टाकावे.
४ ) त्यावर बांधावरिल किंवा जंगलातील मुठभर माती विस्कटून टाकावी.
५ ) शेण खुपच घट्ट असेल तर किंवा आवश्यकता असेल तर थोडेसे (५ ली.) गोमुत्र त्यात वापरता येते .
हे सगळे फावड्याने चांगले आडवे उभे मिसळून सावलीत ढिग घालावा. त्यावर गोणपाट झाकून २४ तास ठेवावे. त्यावर सुर्यप्रकाश व पावसाचे पाणी पडू देऊ नये. ४८ तासानंतर त्याला उन्हात चांगले वाळवावे. त्यात ढेकळे असतील तर मोगरीने बारिक करावेत व चाळणीने चाळून साठवावेत. पेरणीच्या किंवा रोप लावणीच्या वेळेस एका एकराला पेरावे. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
03) घनजीवामृताचे लाडू
वरिल प्रमाणेच शेण, गुळ, बेसन एकत्र मिसळून त्याचे मिश्रण तयार केल्यानंतर व चांगले मिसळून घेतल्यानंतर त्याचे लिंबाएवढे किंवा संत्र्याएवढे हाताने लाडू बनवावेत व उन्हात चांगले वाळवून साठवावेत.वर्षभर साठवता येतात .जमिनीतील पाहुण्यांना म्हणजे जिवाणूंना खाऊ घालता येते , ड्रिपर खाली एक लाडू ठेवून तो गवताने झाकावा त्यामुळे पाणी समांतर सभोवताल पसरेल व घनजीवामृताचे सजीव अवशेष जमिनीत पसरून त्याचा लाभ मिळेल.
* आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
नैसर्गिक प्रभावी किटक नाशके.
1) निमास्त्र:- 1 एकरसाठी रसशोषक कीडी पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी
200 लि.पाणी + 20 लि. देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. देशी गार्इचे शेन + 10 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि. लींबोळी पावडर.
नोट:- लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.
नोट:- निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
2) ब्रम्हास्त्र:- मोठया आळीसाठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी + 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी. ह्या चटण्या टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी + 6
लि. ब्रम्हास्त्र. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
3) अग्नीअस्त्र:- हे बोंड आळी, घाटी आळी साठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 500 ग्रॅम तंबाखू + 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा + 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी. हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळया येउ दया. 48 तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.हे द्रावण 3 महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी प्रती एकरी. 200 लि. पाणी + 6 ते 10 लि. अग्नीअस्त्र. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
4) दशपर्णी अर्क:- दशपर्णी अर्काचा फॉर्म्युला
याचा उपयोग अनेकाना माहितेय आणि अनेकानी विचारलाय की कसा बनवायचा हा अर्क? म्हणूनच येथे देतो आहोत डीटेल फॉर्म्युला:
काय आहे दशपर्णी?
दशपर्णी हा नावा प्रमाणे 10 वनस्पतींच्या पानांचा अर्क आहे. पण सोबतच गोमूत्र , मिरची, लसूण हे पण आहे. या 10 वनस्पती मिळाल्या तर उत्तम, नाहीतर मिळतील तेवढ्या घेऊ शकतो. वनस्पती निवडताना काही मूलभूत गोष्टी समजल्या तर तुम्ही फॉर्म्युला बदलू पण शकता.
वनस्पती निवडताना
1. जनावरे ज्याला तोंड लावत (खात) नाहीत.
2. ज्याला उग्र वास किंवा चव आहे.
3. ज्याचा रस / चीक जहाल आहे- विशेषत: दुधाळ चिकाच्या वनस्पती.
अशा वनस्पती खालील प्रमाणे:-
कडुनिंब, घाणेरी (टनटणी) , निरगुडी, पपई (गावरान), गुळवेल, पांढरा धोतरा, रुई, लाल कण्हेर, वन एरंड (चंद्रज्योत), करंज , सीताफळ पाला, या १० मिळत नसतील तर काजरा, रानतुळस, तंबाखू, तुंबी अशा वनस्पती पण वापरता येतील.
200 लि. पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि.. ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची चटणी हे मिश्रन चांगले ढवळा, व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रनात 10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि. तंबाखू पावडर + 1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी त्या मिश्रणात.
4 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 2 कि. करंजी ची पाने + 2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने + 2 कि. वन येरंडीची (चंद्रज्योत) पाने
2 कि. बेलाची पाने फुलासकट + 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट + रानतुळस + 2 कि. झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची पाने + 2 कि. टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट + 2 कि. रुईची पाने + 2 कि. कन्हेरिचे पाने + 2 कि. जास्वंदाची पाने + 2 कि. कडू कारले + 2 कि. गावरान पपर्इची पाने + 2 कि. आंब्याची पाने + 2 कि. गुळवेलीचे तुकडे + 2 कि. ऋचकी ची पाने + 2 कि. बाउचीच्या फांदया + 2 कि. लांब शेंगाच्या तरोटयाची पाने + 2 कि. आघाडयाची पाने + 2 कि. शेवग्याची पाने + 2 कि. कंबरमोडी + 2 कि. डाळिंबाची पाने + 2 कि शेवग्याची पाने + 2 कि. हळदची पाने + 2 कि. अद्रकची पाने + 2 कि. डाळींबाची पाने + 2 कि. हराळी.
ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत. सगळी पाने मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल.फवारणी प्रती एकरी प्रमाण:- 200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
* आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
प्रभावी बुरशी नाशके:- सर्व पिके व फळबागेसाठी
1) 200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत. हे प्रमाण एक एकर साठी आहे.
2) 100 लि. पाणी + 5 ते 6 लि. आंबटताक आंबट ताक हे बुरशी नाशक, विषाणू नाशक, संजीवक व जंतूरोधक आहे. ताकात संजीवके व एंझाईम्स असतात त्यामुळे फुल फळगड थांबते तसेच हे बुरशी नाशक म्हणून पण कार्य करत देशीगाईचे दुध घेवुन दही बणवने जेवढे दही तेवढे पाणी घेवुन ताक बणवने, 1 एकर साठी प्रमाण २०० लिटर पाणी + ६ लिटर ताक फवारणे.
3) 5 कि. रानगौरी मोगरीने बारिक करा, एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी बांधा. एक मजबूत काडी घ्या व त्या दोरीचे टोक काडीला बांधा व 200 लि. पाण्यात बुडवून ठेवा. 48 तासांनंतर पाण्यातून गाठडी बाहेर काडा व पिळून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या व फवारणीसाठी वापरा. हे प्रमाण एक एकर साठी आहे.
4) ऐका भांडयामध्ये 2 लि. पाणी घ्या, त्या मध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा. द्रावनाला आर्धे होर्इ पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया. दुसऱ्या भांडयामध्ये 2 लि. दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ दया व त्याला थंड होऊ दया.
200 लि. पाणी + सुंठ अर्क + थंड दुध, हे प्रमाण एक एकर साठी आहे. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
पिकांच्या वाढीसाठी, झाडांच्या पोषणासाठी टोंनिक ...
1) 200 लि. पाणी + 2 लि. नारळाचे पाणी.
हे प्रमाण एक एकर साठी आहे. *
आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
किंवा…….
2) सप्तधान्यांकुरअर्क.
ऐका छोटया वाटी मध्ये 100 ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये 100 ग्रॅम मुग + 100 ग्रॅम ऊडीद + 100 ग्रॅम चवळी + 100 ग्रॅम मटकी + 100 ग्रॅम देशी हरबरा + 100 ग्रॅम गहू. ह्या सगळयांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी टाका. घरात ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून घ्या व एका ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकवून ठेवा. भिजवलेले पाणी फेकून देऊ नका.
1 सेमी. मोड आल्यावर सगळयांची चटणी वाटा.
200 लि. पाणी + 10 लि. देशी गार्इचे गोमूत्र + कडधान्य भिजवलेले पाणी व चटणी मिसळा व काडीने चांगले ढवळा व गोणपाट झाका. हे मिश्रन 4 तास ठेवा. 4 तासानंतर पुन्हा ढवळा व गळून घ्या व फवारणी करा.
हे मिश्रण चांगले ढवळा व दोन तास ठेवा. त्यानंतर गळून घ्या व फवारणी करा. हे द्रावन 48 तासांपर्यंत वापरावे. 1 एकरासाठी हे पिकांसाठी/फळबागेसाठी पोषक तत्वाने युक्त सर्वोत्तम टॉनीक आहे.
टॉनीक फवारणीची वेळ: दाणे दुधावर असताना, फळ किंवा शेंगा लहान असताना, पालेभाज्या काढण्याच्या 5 दिवस आधी, फुलं कळी अवस्थेत असताना फवारणी करणे.
* आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
किंवा……
03) गारबेज एंझाईम किवा फ्रुट ज्युस.
गारबेज एंझाईम किवा फ्रुट ज्युस:- गारबेज एंझाईम हे संजीवक, बुरशीनाशक, किटनाशक म्हणून काम करते विविध अमिनोआम्ले पोषक द्रव्य अन्नद्रव्य असतात पिकात प्रतिकार क्षमतावाढवते.
१०० लिटर पाणी + १०किलो काळा गुळ + ३०किलो फळे व भाजीपाला.
भाजीपाला व फळे बारीक करुन गुळाचे द्रावन तयार करुन सर्व एका ड्रम मध्ये टाकुन १०० लिटर पाणी टाका झाकण लावुन सावलीत ठेवा दर ५ दिवसांनी ढवळावे ९० दिवसा पर्यंत,९० दिवसांनी हे तयार होते त्याच्यातला चौथा शेतात टाकावा वगाळुन वापर करावा
याच्यात सर्वप्रकारची फळे भाज्या जी उपलब्ध असतील ती वापरु शकता, लसुण मिरच्या कडुलिंबपाला- लिंबोळया विविध वनस्पति गव्हांकुर ई. चा वापर करावा.
प्रमाण
१५ लि. पाणी + ६० ते ९० मीली गारबेज फवारणी साठी.
५ लि. गारबेज + २०० लि पाणी ड्रिचींग साठी.
१ लि. पाणी + १५० मिली गारबेज बियाणे प्रक्रिया.
किंवा……. मुट्टाई रस्सम. (पुढे दिलेले आहे)
देशी बियाणे (गावराणी बियाणे)
निसर्ग दरवर्षी बदलणाऱ्या ह्वामालाना व बिघडनाऱ्या पर्यावरणाला जुळवून घेणाऱ्या अनुकूल अशा जास्त उत्पादन देणाऱ्या, कमी पावसात तग धरणाऱ्या व किडी रोगांना प्रतिकार करणाऱ्या पिकांच्या सकस जाती नैसर्गिक निवड पध्दतीने सतत विकसित करत आसतो. ह्या गावराणी स्थानिक जाती पौष्टिक, सकस, मधुर व स्वादिष्ट तसेच टिकाऊ अन्न भाज्या व फळे देतात. तसेच ह्या स्थानिक जाती केवळ वाढत्या लोकसंखेचा विचार न करता सर्व सजीवांना जगविण्याची क्षमता राखून असतात. त्यामुळे संकरित जातींची काहीही गरज नाही. संकरित अन्नात केवळ चोथा आसतो, पौष्टिकता, चव, कस, सुगंध, स्वाद, प्रतिकार शक्ती व टिकाऊ पना नसतो. त्यामुळे ते अन्न खाऊन कुपोषण होते, व शरीर अनेक रोगांचे माहेरघर बनते. संकरित जाती मानवी आरोग्यास घातक तसेच जमिनीच्या आरोग्यासही घातक व शेतकऱ्याना परावलंबी व पंगु बनविणाऱ्या असतात. ह्या संकरित जाती शेतकऱ्याना गावरानी जाती पेक्षा कधीच जास्त आसा शुद्ध नफा देत नाहीत. म्हणून सर्वच संकरित वाणावर संपूर्ण बहिष्कार टाकावा व पुरातन गावरानी जाती संकलित करून त्यांचा वापर करावा.
* आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
1) निंबोळी अर्क (5 टक्के) तयार करण्याची पद्धती: -
उन्हाळ्यात गोळा करून साठवलेल्या पाच किलो निंबोळ्या फवारणीआधी 1 दिवस कुटून
बारीक कराव्यात. हा चुरा 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 लिटर पाण्यातील निंबोळीद्रावण पातळ कपड्यातून गाळून घ्यावे. त्यात 1 लिटर साबणाचे द्रावण मिसळावे. निंबोळीचा 5 टक्के अर्क तयार होतो.
10 लिटर अर्कामध्ये 90 लिटर पाणी टाकून फवारणीसाठी वापरावा. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी 1 दिवस आधी तयार केलेला अर्कच वापरावा.
2) कडुनिंबाच्या पानापासून तयार केलेला अर्क: -
कडुनिंबाची 7 किलो स्वच्छ धुतलेली पाने पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करावीत. हे मिश्रण 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. हा संपूर्ण अर्क 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरावा.
3) निंबोळी तेलः -
उन्हात चांगल्या वाळवलेल्या निंबोळ्यांचे वरील साल काढून घ्यावे. पांढरा गर उखळीमध्ये ठेचून लगदा तयार करावा. त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. हा लगद्याचा गोळा एका परातीत चांगला थापावा. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर तेल दिसेल. हा तेलाचा लगदा हाताने चांगला दाबून त्याचे तेल काढावे. गोळ्यातून थेंबाथेंबाने तेल पाझरते. गोळा पुन्हा-पुन्हा तिंबून हाताने दाबावा. गोळ्यातील तेल पूर्णपणे काढावे. उरलेला गोळा प
ाण्यात टाकून उकळल्यास तेल पाण्यावर तरंगते. ते चमच्याने काढून
घेता येते. अर्थात, घाणीमधून अधिक प्रमाणात तेल मिळते. 1 किलो बियांपासून साधारणतः 100 ते 150 मिली तेल मिळते. कडुनिंबाच्या तेलामध्ये ऍझाडिरेक्टीन 0.१५ टक्के, सालान्निन 0.5 टक्के ऍसिटील निंबीन 0.15 टक्के व इपॉक्झी ऍझाडिरेक्टीन हे घटक असतात.
फवारणीसाठी तेल वापरताना साधारणतः - 1 ते २ टक्के तेल म्हणजेच 10 ते 20 मिली तेल प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे वापरावे.
4) निम मलम (बोर्डो पेस्ट ऐवजी)
50 लिटर पाणी + 20 लिटर गोमुत्र + 20 Kg देशी गायीचे ताजे शेण + 20 Kg कडूनिंबाच्या पानांची बारीक चटणी.सर्व एका प्लास्टिक च्या टाकी मध्ये चांगले मिसळून घ्या. 48 तासासाठी सावलीत ठेवून द्या. दिवसातून 2 वेळा काठीने 1 मिनिट हलवून घ्या. आता हि पेस्ट वर्षातून 3 ते 4 वेळा झाडांच्या खोडला लावा.
* आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर *
मिलीबग साठी उपाय: -
देशी बाभुळच्या शेंगा बियासह कुटुन पावडर करावि, १० ग्रम पावडर १लिटर पाण्यात टाकुन घोटावे रात्रभर तसेच राहु द्यावे, सकाळी गाळुन २०० लिटर पाण्यात हे द्रावण टाकुन फवारणी करावी. * आ. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर

0 comments:
Post a Comment