शेतात अनविधानपणे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास लोक बी.एच.सी. १०% किंवा ५०%
अथवा क्लोरेडेन वापरतात. पण हुमणीवर त्याचा पाहिजे तसा इलाज होत नाही.
याकरिता एक सोपा उपाय म्हणजे हुमणीस सुकटी किंवा झिंगेचा वापर करावा.
झिंग्याचा वास हुमणीस आकर्षित करतो. सुकटी शेतात मेथी फेकतो तशी फेकावी.
हुमणीची आळी जमिनीच्या पृष्ठभागावर ती सुकटी खाण्यासाठी येते व नंतर कावळा
येऊन ह्याच हुमणीला खाण्यासाठी हुमणीस अलगद उचलून नेतो. हा प्रयोग शक्यतो
नांगरट चालू असताना करावा. सुकट इतर ओशट पदार्थापेक्षा स्वस्त असते.
नेहमीची खाण्याची सुकट झिंगे विकत न घेता त्याचा गाळ, चुरा घेतला म्हणजे
बदला भावात तो मिळतो. तसा एकरी ४-५० किलो लागतो. जसा सुमणीच प्रादुर्भाव
असेल तसा कमी-अधिक प्रमाणात लागतो. हा उपाय फारच प्रभावी ठरल्याचे अनेक
शेतकर्यांनी अनुभवले आहे.
एकदा पिकाची लागवड झाल्यावर जोपर्यंत मधली तासातली जमीन या पिकाने झाकत नाही, तोपर्यंत १५ दिवसाचे आत हा उपाय बर्यापैकी उपयुक्त ठरतो. कारण एकदा का जमीन झाकली कि मग सुकट टाकून जरी हुमणीची आळी वर खाण्यास आली तरी ती पिकाचे आड असल्याने लगेच खाऊन जमिनीत किंवा पिकाआड लपते व कावळ्यास दिसत नाही, तेव्हा शक्यतो वरील उपाय मोकळ्या जमिनीत करावा. प्रतिबंधक उपाय हा वर सांगितल्याप्रमाणे करावा.

0 comments:
Post a Comment