भारतात जी सेंद्रिय शेती आहे, त्यापकी ८० टक्के क्षेत्राची जपणूक आदिवासी
क्षेत्रातील मंडळी करतात. देशभरात आदिवासींची संख्या सुमारे २७ टक्के आहे.
ही मंडळी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पिढय़ान्पिढय़ा बियाण्यांचे संवर्धन
करत शेती करतात. बाजारात तूर बियाणे विकत घेऊन शेती करता येते हे त्यांच्या
गावीही नाही. रासायनिक खते व कीटकनाशक वापरण्याची गरज त्यांना कधी भासत
नाही. आदिवासींनी सांभाळलेले वाण अतिशय उच्च दर्जाचे असून शहरी भागातील
मंडळी अतिरिक्त मूल्य देऊन हे धान्य खरेदी करतात. आदिवासींनी जपणूक केलेले
वाण अभ्यासून ते देशभरातील शेतकऱ्यांना उपयोगी व्हावे यासाठी सरकारने
पुढाकार घेण्याची गरज आहे.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment