पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात
थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६
मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन,
मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले
जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
पपईच्या फळापासून टूटी फ्रुटी, पपई प्युरी, पपई पावडर, बेबी फूड्स ई
प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात.
क्षेत्र व उत्पादन
- भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम , बिहार, व पश्चिम बंगाल ई. राज्यात मोठ्या प्रमाणत उत्पादन होते
- महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई घेतली जाते
- कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून मिळते
हवामान
- कडाक्याची थंडी, जोरात येणारे वारे आणि धुके या पिकाला हानिकारक ठरते
- उष्ण कटीबंधात हे पिक जोमाने वाढते तथापि समशीतोष्ण हवामानातही उत्पादन चांगले होते
- पपई पिकास सरासरी तापमान २५ ते ३८ अंश से आणि वार्षिक पर्जन्यमान १५०० मि. मी . मानवते पपईची झाडे जास्तीत जास्त ४४ अंश से तर कमीत कमी १० अंश से तापमान सहन करू शकतात
जमीन
- उत्तम निचर्याची मध्यम काळी किवा तांबडी व हवा राहणारी जमीन योग्य ठरते
- जांभ्या खडकात पपईची झाडे उत्तम वाढतात
- खडकाळ जमिनीत हे झाड चांगले वाढत नाही
- जमिनीचा सामू ६.५ ते ८.० योग्य असतो
जाती
- पपई सिलेक्शन क्र. १,२,३ व ५ , को-५, को- ६, पुसा ड्वार्फ , पुसा नर्हा, पुसा जायंट, कुर्ग हनी, को-७, पुसा डेलीशीस, सनराइस सोलो या जाती आहेत.
- पेपेनसाठी को -६ , व पुसा मेजेस्टी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
रोपे तयार करणे
- एक हेक्टर लागवडीसाठी २५० ते ३०० गरम बियाणे पुरेसे आहे
- रोपे तयार करण्याच्या आधी २ ते ३ ग्रॅम कार्बेन्डझिम प्रती किलो बियाण्यास लावावे
- हि रोपे साधारण ६ते ७ आठवडे झाल्यानंतर आणि उंची १५ ते २२ से. मी . झाल्यानंतर करावी
पूर्वमशागत व लागवड
- लागवडीपूर्वी जमिनीची आडवी, उभी नांगरणी करावी
- शेणखत हेक्टरी २० ते २५ टन (४० ते ५० बैलगाड्या) पसरवून मातीत मिसळून घ्यावे व जमीन सपाट करावी
- लागवडीतील अंतर २.२५ मी X १.५ मी. लागवड करण्याने २००० झाडे बसतात. १.५ बाय १.५ मी या पद्धतीत ४४४४ झाडे लावली जातात
- यासाठी पुसा नन्हा या बुटक्या जातीची निवड करावी
- शेताची आखणी केल्यानंतर ४५X ४५X ४५ से. मि. आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत
मल्चिंग
- बाग तणविरहित ठेवण्यासाठी मल्चिंग फायद्याचे ठरते त्यामुळे पाण्याचीही बचत होते
- पॉलिथीनचा काळ्या रंगाचा मल्चींग पेपर (४० ते ५० मायक्रोन जाडीचा ) पपईच्या दोन झाडाच्या ओळीमध्ये अथरून त्याच्या कडा मातीत बुजून टाकव्यात
लागवड
- जून- जुलै, सप्टेबर- ऑक्टोबर आणि जाने -फेब्रु या महिन्यात करतात
- पपईची रोपे लागवडीसाठी ५० ते ६० दिवसात तयार होतात
- लागवडीनंतर फळे ११ ते १२ महिन्यात काढणीस तयार होतात
खत व व्यवस्थापन
खत | प्रत्येकवेळी हप्त्यात (ग्राम प्रतिझाड) |
अमोनियम सल्फेट किवा युरिया | २५० किवा १०० |
सिंगल सुपर फॉस्फेट | ३०० |
सल्फेट ऑफ पोटाश | ८२ |
0 comments:
Post a Comment