200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा, व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मिश्रनात 10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि. तंबाखू पावडर + 1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 2 कि.करंजी ची पाने +
2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने + 2 कि. येरंडीची पाने + 2 कि. बेलाची पाने फुलासकट + 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट + 2 कि. झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची पाने + 2 कि. टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट + 2 कि. गावरान पपर्इची पाने + 2 कि.आंब्याची पाने + 2 कि.गुळवेलीचे तुकडे + 2 कि. ऋचकी ची पाने + 2 कि. कन्हेरिचे पाने + 2 कि.बाउचीच्या फांदया + 2 कि. तरोटयाची पाने + 2 कि.आघाडयाची पाने + 2 कि. शेवग्याची पाने + 2 कि.कंबरमोडी + 2 कि.जास्वंदाची पाने + 2 कि.डाळिंबाची पाने + 2 कि. हराळी
ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
0 comments:
Post a Comment