शेतीची काही ठळक वैशिष्ठ्ये:



हया शेतीची काही ठळक वैशिष्ठ्ये:
  • ही शेतीची पुरातन पध्दती नसून ही निसर्ग, विज्ञान व आध्यात्म आधारित अशी शाश्वत कृषी पध्दती आहे. एका गावरान देशी गाई पासून या पध्दतीनुसार आपण ३० एकर शेती करू शकता - मग ती सिंचित असो किंवा कोरडवाहू असो.
  • या पध्दतीमध्ये आपल्याला ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीने शेणखत तसेच रासायनिक खते, कीटकनाशक, सेंद्रिय खते, गांडूळ-खत अश्या कोणत्याही निविष्टा विकत आणाव्या लागत नाही. तसेच या पध्दतीत १०% पाणी व १०% विजेची आवश्यकता असते; म्हणजेच ९०% पाणी व विजेची बचत.
  • या नैसर्गिक शेतीत उत्पादन रासायनिक व सेंद्रिय शेती पेक्षा मुळीच कमी मिळणार नाही, उलट जास्त मिळेल. उत्पादित शेतमाल हा पूर्णतः विषमुक्त, पौष्टिक, दर्जेदार व स्वादिष्ट असतो त्यामुळे जास्त मागणी व भावही चांगला मिळतो.
  • ही शेती करणारा एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही कारण त्याचा उत्पादन खर्च शून्य आहे.
  • रासायनिक व सेंद्रिय शेतीमुळे मानव, पशु, पक्षी, पाणी, पर्यावरणाचा विनाश होत आहे. परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या सर्वांचा विनाश टाळला जातो व नैसर्गिक संसाधनांची शाश्वतता वाढते.
  • शून्य उत्पादन खर्च, जास्त उत्पादन, उत्तम दर्जा, चांगली मागणी, योग्य भाव अश्या हया शेतीमुळे खेड्याकडून शहराकडे होणारे मानवी स्थलांतर रोखता येईल. या सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला पाहिजे.

सूचना: भाग ऐकतांना आकृत्या (PDF) येथे बघा म्हणजे विषय समजेल.
संपूर्ण शिबिर २० भागात येथे ऐका:
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment