आता आंध्र प्रदेश मध्ये 'झिरो बजेट शेती' प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे.
गेली दोन वर्षं 1000 गावांमध्ये हा प्रयोग सुरू आहे. आता पूर्ण राज्याची
शेती रसायनविरहित आणि कीटकनाशकमुक्त करण्याचा निश्चय आंध्र प्रदेशचे
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
गेल्या जूनमध्ये नायडू यांनी झिरो बजेट शेतीचं विद्यापीठ सुरू करण्यासाठी 100 कोटी रूपयांची आणि 100 एकर जमीन देण्याची तरतूद करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली होती. अशा प्रकारचं हे भारतातलं पहिलं विद्यापीठ असणार आहे. आणि सुभाष पाळेकर या विद्यापीठाचे सल्लागार असतील.
झिरो बजेट शेतीच्या विद्यापीठासाठी आंध्रमध्ये सध्या शास्त्रज्ञांची टीम काम करत असल्याचं रयतू संधिकारा संस्थेचे (Farmers Empowerment Corporation) संचालक टी. विजय कुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. ही संस्था आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्थापन केली आहे. विद्यापीठाच्या उभारणीसाठी रयतू संधिकारा संस्था काम करणार आहे.
"विद्यापीठाचा उद्देश शेतकऱ्यांना माहिती, प्रशिक्षण, आणि संशोधन अशा तीन पातळीवर असणार आहे आणि आंध्रमधील प्रत्येक गाव या विद्यापीठाशी जोडलं जाईल," अशी माहिती त्यांनी दिली. पाळेकरांची झिरो बजेट शेती महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू येथील शेतकरी करत आहेत. हरयाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यातही त्यांची शिबिरं होत असतात. पण पाळेकरांच्या झिरो बजेट शेतीवर टिकाही होते.

0 comments:
Post a Comment