झिरो बजेट शेतीमध्ये पाळेकरांनी 'जीवामृत' विकसित केलं. झाडाच्या बुंध्याशी
हे जीवामृत ठराविक दिवसांनी टाकावं लागतं. खत म्हणून त्याचा उपयोग होता
आणि त्यामागे एक शास्त्र आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
"देशी गाईला पूर्वीपासूनच महत्त्व आहे. गोसंस्कृती गाईच्या शेणावर संशोधन करण्यासाठी देशातल्या गायींच्या 36 जाती मी तपासल्या. त्यांचं शेण, मूत्र प्रयोगशाळेत तपासलं. कित्येक कोटींच्या जीवाणूंसाठी देशी गायीचं शेण हे खरं विरजण आहे. एक ग्रॅम शेणात 300 कोटी उपयुक्त जीवाणू असतात. तर जर्सी गाईच्या शेणात केवळ 70 लाखापर्यंत जीवाणू. त्यामुळे देशी गायीच्या शेणातल्या जीवाणूंचा वापर करून मी जीवामृत तयार केलं," त्यांनी सांगितलं.
गाईचा विषय निघाल्यावर पाळेकर आवर्जून सांगतात- "जेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे कोणतेही धर्म अस्तित्वात नव्हते, तेव्हा हजारो वर्षांपूर्वीही लोक शेती करत होते. त्यामुळे गाईचं महत्त्व धर्मापेक्षाही मोठं आहे."
शेतीशी जोडलेलं गायीचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या पाळेकरांना अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलं आहे. ते म्हणतात, "मी गायीविषयी मांडणी केली की डावे म्हणतात की मी उजवा आहे, आणि मी शेती व्यवस्थेतल्या शोषणाची मांडणी केली की उजवे म्हणतात मी डावा आहे."

0 comments:
Post a Comment