सेंद्रीय कार्बन म्हणजे काय

सेंद्रीय कार्बन म्हणजे काय ?
सेंद्रीय कर्ब म्हणजे पिकांच्या पानांनी म्हणजे पिकांच्या पानरूपी इंद्रीयाणी प्रकाश संश्‍लेषणच्या मध्यमातुन हवेतुन घेतलेले कार्बन होय.
सेंद्रीय नत्र म्हणजे काय ?
सहजीवी व असहजीवी नत्रांनुनी आपल्या इंद्रीयाच्या माध्यमातुन हवेतुन घेतलेला नत्र म्हणजे सेंद्रीय नत्र होय. ऊसाचे अंतरपिक चवळी, हरबरा
सेंद्रीय कर्बाचे प्रकार
1) उडनशील(पळपुट्टया) कर्ब वोलाटार्इल कार्बन
2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन
3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन

1) उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन
कोणतेही अंतरपिक फुलोरयावर येणाच्या आधी कापून  आच्छादन करतो ते आच्छादन कुजून जो कर्ब मोकळा होतो त्या कार्बनला पळपुट्टया कार्बन म्हणतात.
हा कार्बन ह्युमस मध्ये कधीच जमा होत नाही  व हवेत निघून  जातो व वातावरणाचा तापमान वाढवतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात आच्छादन करू नये.
2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन
कोणताही अंतरपिक फुलावर आल्यानंतर ते कापून  आच्छादन केले तर त्यामध्ये अस्थिर कर्ब असतो. तो कधीच ह्युमस मध्ये जमा होत नाही पण हा कर्ब ताबडतोब मुक्त होत नाही काही  वेळांनी मुक्त होतो व हवेत निघून जातो म्हणुन हा अस्थिर कर्ब आपल्या कामाचे नाही  म्हणुन कोणतेही अंतरपिक फुलोरयावर कापू  नये.
3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन
हा स्थिर कर्बच फक्त ह्युमस मध्ये जमा होतो. ह्याच्यामुळे ह्युमस ची निर्मिती होते जेव्हा अंतरपिकांचे दाने पक्व होण्याच्या स्थीतीत असतात त्यावेळेस
कर्बाची निर्मीती होते. आणी हा स्थीर कर्ब लीगनीन(काष्ठजन्य पदार्थ) व सेल्युलोज (काष्ठक जन्य पदार्थ) ह्याच्यामध्ये संग्रहीत होते. म्हणुन ह्युमस निर्माण करण्यासाठी दाणे पक्व झाल्यानंतर आच्छादन दिले पाहिजे.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment