वाफसा व पाणी व्यवस्थापन

वाफसा
पिकांच्या मुळांना पाणी पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे. तर पिकांच्या मुळींना वाफसा पाहिजे.उदाहरणात दुशकाळी पट्टयात पाऊस नसताना बिनासिंचनाच्या चिंचेच्या झाडाला अमाप चिंचा लागतात.
1. वाफसा म्हणजे काय ?
जमिनीत दोन मातीकण समुहादरम्यान ज्या रिकाम्या पोकळया असतात त्या रिकाम्या पोकळयामध्ये पाण्याच अस्तीत्व अजीबात नको, तर 50% पाण्याची वाफ व 50% हवा ह्यांच संमिश्र पाहिजे. ह्याच स्थीतीला वाफसा म्हणतात.
2. वाफसा घेणारी मुळी कुठे असते ?
कोणत्याहि झाडाची दुपारि बारा वाजता जी सावली पडते त्या सावलीच्या शेवटच्या सिमेवर अन्न आणि वाफसा घेणारी मुळी असते. ती त्या सावलीच्या आत नसते.झाडाच्या मुळीला किती प्रमाणात वाफसा पाहिजे हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुळींचा असतो आपला नसतो.
दुपारि 12 वा. पडणाऱ्या  सावलीच्या कडेला जर अन्न व वाफसा घेणारी मुळी आहे, जर आपण  सावलीच्या सीमेवर पाणी दिले तर तो निर्णय आपला असतो. अशा स्थीतीत वाफसा होत नाही . परंतु जर आपन सावलीच्या सीमेच्या 6 इंच बाहेर पाणी दिले तर मुळी त्या पाण्यापर्यंत जाते व पाहिजे तेव्हा वाफसा घेते.म्हणुन झाडाच्या सीमेवर पाणी देऊनये. तर 6 इंच बाहेर नाली काढून  पाणी दयावे.
सावलीच्या आतमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या  पावसाचं पाणी थांबललं  किंवा सिंचनाचं पाणी थांबलं  तर मुळया सडतात व सडीचे प्रमाण वाढेल. अशा स्थीतीमध्ये झाडाच्या मुळीला  फायटोथोरा बुरशी लागते आणि मुळीचं  आवरण  सडवून टाकते. त्यामुळे  वर जाणार अन्न पुरवठा बंद होऊन फांदयांवर झाड सुकायला लागते.  परंतु  जर आपण सावलीच्या सीमेपासून खोडापर्यंत मातीचा भर दिला व बाहेर उतार काढला तर पावसाचं  व सींचनाचं  पाणी ताबडतोब बाहेर निघून जाते  व मुळया सुरक्षित राहतात.
फायटोथोरा बुरशी प्रचंड नुकसान करते परंतु तिथे नियंत्रण करणारी मित्र बुरशी ट्रायकोडरमा जर आपन जमिनी़मध्ये उपलब्ध केली तर फायटोथोरा चे नियंत्रन होते. जीवामृतामध्ये ट्रायकोडरमा बुरशीचे जीवाणू असतात . म्हणून जीवामृताचा सतत वापर केला व झाडाच्या खोडाला माती चढवून पाण्याचा उतार बाहेर काढून दिला व सावलीच्या 6 इंच बाहेर सरी काढुन सिंचनाचे पाणी दिले तर फळ झाडावर मर किंवा डिंक्या रोग येत नाही माती चढवल्यावर पावसाचे   पाणी निघून जार्इल परंतू जमिनीच्या आत मुळीजवळ अतिरीक्त ओलावा कायम असतो. त्यामुळे सुद्धा रोग निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु जर आपण सीमेच्या 6 इंच बाहेर सरी काढली तर मुळी जवळचा ओलावा नालीत उतरतो व मुळीजवळ वाफसा होतो.

पाणी व्यवस्थापन :

1. झाडाची हिरवी पाने प्रकाश संश्‍लेषन क्रियेच्या माध्यमातुन जे अन्न तयार करतात ते खोडामध्ये साठवतात. जर खोडामध्ये 100 किलो अन्न साठवलेले असेल तर त्यापासून आपल्याला 33 किलो धान्याच उत्पादन मिळते किंवा 50 किलो फळाचा, ऊसाच उत्पादन मिळते.याचा अर्थ खोडमध्ये जितका जास्त अन्न साठवला जार्इल तेवढा जास्त उत्पादन मिळेल. म्हणजे पानांनी सगळ तयार केलेल अन्न बुडात साठले पाहिजे त्यासाठी खोडाचा घेर मोठा असला पाहिजे.
2. परंतु जर खोडाचा घेर कमि असेल तर पान अन्न निर्मीती घटवतात. त्यामुळे उत्पादन घटत. जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल तर पानांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने तयार केलेले अन्नसाठा खोडात साठवण्यासाठी  खोडाचा घेर वाढवला पाहिजे.
3. खोडाचा आकार तेव्हाच वाढते जेव्हा मुळीचा आकार वाढतो. म्हणजे खोडाचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला मुळीचा आकार वाढवला पाहिजे.
4. मुळीचा आकार तेव्हाच वाढतो जेव्हा मुळीची लांबी वाढते. म्हणजेच मुळीची लांबी वाढवली पाहिजे.
5. मुळींची लांबी तेव्हाच वाढते जेव्हा मुळी पासून पाणी दुर दुर नेल्या जाते. म्हणजे आपल्याला पाणी मुळीपासून दुर दिले पाहिजे.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment