चला नैसर्गिक शेतिकडे-एक

आज देशभरातील लाखो शेतकरी आनंदी व समाधानी जीवन जगत आहेत.आनंदी व समाधानी जीवन जगण्याची कला पाळेकर गुरुजींच्या शिबिरात शिकायला मिळते. गुरुजींच्या शिबिराला ऐकण्याची सुरुवात होताच शेती संबंधीचे विचार आणि आचार बदलायला सुरुवात होते. ज्वारी, गाय ,गोमूत्र, शेण ,शेतातील काडीकचरा, देशी गांडूळ,गावरान बियाणे, बैल यासारख्या कमी महत्त्वाच्या न परवडणाऱ्या गोष्टी अचानक अनमोल वाटायला लागतात. या गोष्टींना आपण आत्तापर्यंत वायफळ समजत होतो ही कल्पनाच माणसाला गोंधळून टाकतात. *काखेत कळसा नि गावाला वळसा* या म्हणी सारखे आपल्याजवळ असणाऱ्या या अमूल्य गोष्टी सोडून आपण भलत्याच गोष्टींचा मागे लागलो आहोत याची जाणीव आपल्याला होते. गुरुजींचे पाच सात दिवसांचे शिबिर ऐकताच पंधरा वीस वर्षापासून मानगुटीवर बसलेले रासायनिक शेतीचे भूत हळूहळू उतरायला लागते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या नकळत हळूहळू होणारे दुष्परिणाम लक्षात येऊ लागतात.
*पाच-दहा वर्षांपूर्वी शेतीसाठी होणारा खर्च व लागणारी वीज पाणी खते कीटकनाशके यात दरवर्षी वाढ होत आहे. याची जाणीव होऊ लागते.*
*दुसरीकडे शेतीमध्ये रोग व किडी मध्ये वाढ होत आहे.अतिवृष्टी दुष्काळ याविरुद्ध लढण्याची क्षमता कमी होत असल्याचे आपल्या लक्षात येते.या सर्व होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकरी नेहमी स्वतःला, वातावरणाला, जमिनीला दोष देतो पण या सर्व नुकसानीसाठी आपली रासायनिक शेती पद्धती जबाबदार आहे हे त्याच्या लक्षात यायला लागते.*
* शिबीरातून प्रेरित होऊन येणारा शेतकरी सरकार बँक, बदलते हवामान,सामाजिक संस्था, कृषी विद्यापीठ, मिडीया, बियाणांच्या कीटकनाशकांच्या कंपन्या यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी एका विचाराने झपाटलेले नैसर्गिक शेतीचे सेनापती एकमेकांच्या मदतीने भरपूर उत्पादन देणारे नैसर्गिक शेतीचे उत्कृष्ट मॉडेल निर्माण करून व स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण करून चांगला नफा मिळवत आहेत.एकीकडे शासन व कंपन्या मिळून सेंद्रिय शेतीवर करोडो रुपये खर्च करत आहेत. सरकारची संपूर्ण यंत्रणा सेंद्रिय शेतीचा जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहे. याउलट नैसर्गिक शेतीच्या जाहिरातीचे फलक तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत पण तुमच्या परिसरात जर तुम्ही चिकित्सक दृष्टीने शोध घेतलात तर आपली संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करून समृद्धी मिळवणारे व समाधानी जीवन जगणारे एक दोन तरी शेतकरी आपल्याला नक्कीच भेटतील हिच नैसर्गिक शेतीच्या यशाची पावती आहे.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment