झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक सुभाष पाळेकर

रासायनिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या किटकनाशक फवारणीमुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे बळी गेल्याच्या घटना 2017मध्ये घडल्या. या रासायनिक शेतीला कडाडून विरोध करणाऱ्या शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांनी संशोधनाअंती झिरो बजेट शेतीचं मॉडेल उभं केलं आहे.
शेतीतल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसंच महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांच्या मॉडेलनुसार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
पाळेकरांच्या झिरो बजेट शेतीचा प्रयोग आंध्र प्रदेशमध्ये गावागावात राबवण्यासाठी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आणि त्यासाठी 300 कोटी रूपयांची तरतूद करणार असल्याची घोषणाही केली आहे.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment