सुभाष पाळेकर गुरुजींचे आध्यात्मिक विचार व आध्यात्मिक शेतीचे तत्वज्ञान भाग - ५

सुभाष पाळेकर गुरुजींचे आध्यात्मिक विचार व आध्यात्मिक शेतीचे तत्वज्ञान
भाग - ५
🍂🍃🌿🍀🍁🌻
मुक्तिचा मार्ग - झिरो बजेट आध्यात्मिक शेती चळवळ : - षड्विकाराविरुद्ध आतील आतील आवाजाने पुकारलेलि स्वतःची चळवळ .
🍂🍃🌿🍀🍁🌻🌺

बंधुनो आपण कदाचित आमच्या शेतकरी बंधुसारखे शेती करणारे नसाल , शहरी ग्राहक असाल , शेती कशी करतात ते आपणास माहिती नसेल . त्यामु़ळे शेतिबाबत आपणही जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नसेल . म्हणुन ही नैसर्गिक शेती चळवळ काय बला आहे , हा गहन प्रश्न सुद्धा शहरी बान्धवाच्या मनात डोकावु शकतो .
नैसर्गिक शेती चळवळ ही आपणा सर्वांचीच चळवळ आहे . आपण जरी शेतिबाबत अनभिज्ञ असाल तरी , आपला प्रत्येक श्वास , रक्तामासाचा प्रत्येक अणु - रेणु शेतीशी अतूट संबंध दाखवत असतो . कारण तो प्रत्येक श्वास , रक्तमासाचा प्रत्येक अणु - रेणु आपण खात असलेल्या अन्न , पाणी व हवेतुन निर्माण झालेला असतो . हे अन्न शेतितुन निर्माण होते . दुसऱ्या अंगाने , आपला हा प्रत्येक श्वास , रक्तामासाचा प्रत्येक अणु- रेणु जमिनीतील जीवाणु सृष्टि व शेतकरी , शेतमजुराच्या अथक परिश्रमाने , कष्टाने व गाळलेल्या घामातून येतात . म्हणजे आपला शेतीशी चोलिदामनचा सन्वन्ध आहे , हे आता लक्षात आल असेल .आपण घेत असलेल्या अन्नाचा प्रत्येक घास , दुधाचा प्रत्येक घोट विषाने भरलेला आहे , हे शास्त्रानिच सिद्ध केले आहे .
रासायनिक शेती व अतिरिक्त भोगवादि संस्कृति यानी आपल संपूर्ण जीवन विषारी केल आहे . त्यामु़ळे क्षणाक्षणाला आपण आपल्या मृत्युला जवळ करत आहोत . ह्या विषारी जीवनातुन मुक्ती तेव्हाच मिळेल ना , जेव्हा आपणास निर्विश अन्न , प्रदुषणमुक्त पाणी , हवा व पर्यावरण आणि भोगमुक्त संस्कृति मिळेल ? हे सर्व फक्त नैसर्गिक शेतितुन मिळणार आहे . झिरो बजेट आध्यात्मिक शेती म्हणजे कोणतीही रासायनिक खत किंवा इतर विषारी सन्साधने न टाकता , विषारी किटकनाशकाची फवारनि न करता व संकरीत जातीचा वापर न करता , जमिनीतुन स्वच्छ , सुंदर , निकोप , चवदार , पौष्टिक , कसदार , सुगंधी , निर्विश व प्रदुषणमुक्त असे धान्य , भाज्या , फळे , दुध , पाणी , हवा , पर्यावरण व निसर्ग निर्माण करून आपणास उपलब्ध करुन देणे हे . हे केवळ झिरो बजेट शेतितुनच शक्य आहे .
ह्या झिरो बजेट आध्यात्मिक शेती चळवळीत प्रत्येक प्राणिमात्राला प्रवेश आहे . मग तो विषारी रसायने निर्माण करणारा उद्योगपती असो किंवा विकनारा विक्रेता असला तरी ! कारण त्याला ही वरील निर्विश अन्न , पाणी , दुध , हवा व पर्यावरण हवे आहे . ही आमची नैसर्गिक शेती चळवळ कोणाविरुद्दही नाही . या चळवळीत प्रत्येक धर्म , पंथ , पक्ष , समाज , जात , उपजात , उद्योगपती , व्यापारी , विध्यार्थी , सेवेकरि , शिक्षक , प्राध्यापक , डॉक्टर , वकील , शेतकरी , शेतमजुर , राजकारणी , आबालवृद्ध इत्यादि समाजाचे सर्वच घटक समाविष्ट राहणार आहेत . सर्वाचे या चळवळीत स्वागत आहे . आपणास फक्त एकच कार्य करायचे आहे , विशमुक्त नैसर्गिक अन्न , फळे , दुध निर्माण करायचे आहे , खायचे आहे , विकत घ्यायचे आहे , विकायचे आहे आणि दुसर्यास हे सांगायचे आहे ही एवढीच आपली फी . हे आपण चालु व्यवसाय किंवा छंद सांभाळून अगदी निर्धोकपणे करुन शकता .
ह्या नैसर्गिक शेती चळवळीला सध्या उपलब्ध असलेले सर्वच तर्हेचे ग्रामीण व शहरी ( नागरी ) व्यासपीठ , विचारपिठ व कृतिपिठ हवे आहेत . ह्या चळवळीत हिंसा नाही , आंदोलन नाही , मोर्चे नाही , बंद नाही , बेकसूर व ज्यांची भाव मिळवून देण्यात कोणतीही भुमिका नाही अशा प्रवाश्याला वेठीस धरनारा अस्सल दशहतवादि रस्ता रोको नाही , संप नाही , टाळेबंदी नाही , काम रोको नाही , घेराव नाही , अश्रुधुर नाही , लाठीमार किंवा गोळीबार नाही . संसद किंवा विधानसभेला काळिमा फासनारि खुर्च्याचि फेकाफेक नाही , दंगली नाही , गोंधळ नाही , सभागृहाचे अपरिमित नुकसान करणारे असंवैधानिक पद्धतीने कामकाज बंद पाडणे नाही कि लेखणी युद्ध नाही ! अगदी काहीही नाही ! कारण , ही आध्यात्मिक / नैसर्गिक शेती चळवळ कोणाही विरुद्द नसून ती स्वताविरुद्द , स्वतःमधील काम , क्रोध , मोह , लोभ , मत्सर व तृष्णा ( षड्विकार ) या विकाराविरुद्द स्वताचे आतील आवाजाने पुकारलेली चळवळ आहे . आपणासर्वाचे ह्या चळवळीत स्वागत असुन आपले सक्रिय योगदान हवे आहे .
🍂🌿🍀🍁
सराच्या ग्रंथसन्पदेतिल अनमोल मोती व त्याचे 🌻🍀🌿🍃🍂
अहो भाग्य
गौवंश आधारित नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री सुभाष जी पाळेकर गुरुजी सोबत संत तुकाराम महाराज अखंड गाथा मंदिर श्रीक्षेत्र देहू
राम कृष्ण हरि
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment