- प्रा. सी. बी. बाचकर, डॉ. के. जी. शिंदे, डॉ. एम. एन. भालेकर
* लसूण पातीसह काढून जुड्या बांधून सावलीत सुकवावा.
* वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या बगलफुटी काढून टाकाव्यात व वेलांना मातीची भर द्यावी. वेलांना
मंडप किंवा ताटीवर सुतळीवर आधार द्यावा.
* वेलवर्गीय भाजीपाला पिकांना फुले येणाऱ्या व फळ पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये.
महाराष्ट्रात सध्या विषय हवामान चालू आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन व पुन्हा सायंकाळी थंडी असे
वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांवर रस शोषणाऱ्या किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
* कांदा - कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फूलकिडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
नियंत्रणासाठी फवारणी (प्रतिलिटर पाणी)
कार्बोसल्फान १ मिली किंवा
फिप्रोनील १.५ मिली किंवा
डेल्टामेथ्रीन (१%) + ट्रायझोफॉस (३५%) (संयुक्त कीटकनाशक) २ मिली.
टीप - वरील कीटकनाशकासोबत १ मिली स्टिकर मिसळावे.
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी)
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा
क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा
टेब्युकोनॅझोल १ मिली
टीप - कीड व रोगांचा प्रादुर्भाव एकाच वेळी असल्यास, वरील कीटकनाशकात मिसळून फवारणी करता येईल.
* भेंडी -
- भेंडी पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास
नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी)
इमिडाक्लोप्रिड ०.४ मिली किंवा थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम
फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी किडकी फळे तोडून खड्ड्यात पुरावीत.
नियंत्रणासाठी (फवारणी प्रतिलिटर पाणी)
डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.८ मिली. किंवा
प्रोफेनोफॉस (५० ईसी) १ मिली किंवा
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.३ मिली
* मिरची - मिरचीवर किडीनिहाय विविध विषाणूजन्य रोगांचा प्रसार फूलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या किडींमार्फत होतो. नियंत्रणासाठी रोप लागवडीनंतर २५ दिवसांनी
(फवारणी प्रतिलिटर पाणी)
फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १.५ मिली
कोळी नियंत्रणासाठी फेनाक्झाक्विन २ मिली
* वेलवर्गीय भाजीपाला - काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय पिकांवर केवडा रोग येतो.
रोगकारक बुरशी - स्युडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस
लक्षणे - सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे-काळे किंवा राखाडी झालेले दिसतात.
उपाययोजना -
- रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
- प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून ८ ते १० दिवसांच्या अंतराने क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच,
मेटॅलॅक्झिल एम. अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात दर दहा दिवसांच्या अंतराने फवारावे.
* भुरी - जवळपास सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग येतो.
लक्षणे - रोगाची सुरवातच प्रथम जुन्या पानांपासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
उपाय - भुरी रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रतिलिटर पाणी)
डिनोकॅप १ मिलि किंवा ट्रायडेमॉर्फ १ मिलि किंवा पेनकोनॅझोल १ मिली किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति १० लिटर
- पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
* टोमॅटो - सध्या काही भागात उन्हाळी टोमॅटोची लागवड चालू झालेली आहे.
१) विषाणूजन्य रोग -
टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लिफ कर्ल) रोगाचा प्रसार पांढरी माशीमार्फत होतो. तसेच टाॅस्पोव्हायरस आधारित रोग फूलकिड्यांमार्फत होतात. या किडींचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे आहे.
उपाययोजना -
- रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा.
- टोमॅटोच्या पुनर्लागवडीनंतर दहा दिवसांनी १० किलो फोरेट प्रतिहेक्टरी या प्रमाणात झाडाभोवती गोलाकार पद्धतीने टाकून झाकावे व पाणी द्यावे.
- (फवारणी प्रतिलिटर पाणी)
फिप्रोनिल (५ ईसी.) १.५ मिली. किंवा कार्बोसल्फान (२५ ईसी) १ मिली
अधिक
मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम.
२) फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी)
डेल्टामेथ्रीन (१%) + ट्रायझोफॉस (३५%) (संयुक्त कीटकनाशक) २ मिली किंवा
सायपरमेथ्रीन (१० ईसी) १ मिली
संपर्क - ०२४२६- २४३३४२
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प- भाजीपाला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
★★★★★★★★
★शेती मित्र शेतकरी★ ★★★★★★★★
शेती क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी,आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीपूरक व्यवसाय आणी इतर अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली लिंक ओपन करून आपले शेतीमित्र शेतकरी हे पेज लाइक करावे आणि हि माहिती आपल्या सर्व मित्रांबरोबर , व्हाट्सअँप ग्रुप वर आणी मित्रांच्या टाईम लाईन वर शेअर करावी ही विनंती.
हि माहिती तुमच्या जरी उपयोगी नसेल तरी ती तुमच्या कोणी मित्रांच्या उपयोगी पडेल.
https://m.facebook.com/shetimitra.shetkari/
★★★★★★★★★★

0 comments:
Post a Comment