शेळीपालन व्यवसायात जर फायदा वाढवायचा असेल तर स्थानिक बाजारपेठेतील विक्रीबरोबरच मटणाची निर्यात हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. निर्यातीमुळे स्थानिक बाजारपेठेत मटणाच्या विक्रीसाठी व दरासाठीची करावी लागणारी कसरत व धडपड कमी करता येते.
डॉ. तेजस शेंडे
भारत मटण मुख्यतः अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, कुवेत ओमान व इतर अशा जवळपास २५ देशांना निर्यात करतो. मटणाची किंवा कुठल्याही शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करायची असेल तर त्याला काही अटी व नियम पाळावे लागतात जे आयात करणाऱ्या देशाचे व भारत सरकारच्या निर्यात विभागाने प्रमाणित केलेले असतात.
भारतात केंद्र शासनाअंतर्गत अपेडा (APEDA ः Agricultural and Processed Food Products Export Development Authority) नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या परवानगीशिवाय भारतामधून कुठल्याही शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करता येत नाही. या संस्थेचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे तर विभागीय उपशाखा महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. कुठल्याही मालाची निर्यात करायची असेल तर त्या मालाची अपेडा संस्थेत नोंदणी करणे अनिवार्य असते.
बोकडाच्या मटणाच्या निर्यातीसाठी आवश्यक नियम व अटी
- केंद्र शासनाने मटणाच्या निर्यातीसाठी कत्तलखाना, मटणाचे उपपदार्थ निर्मिती यासाठी काही नियम ठरवले आहेत जे पाळणे बंधनकारक आहे.
- निर्यातीसाठी वापरला जाणारा कत्तलखाना हा अपेडाने नोंदणीकृत व परवानाधारक असणे आवश्यक आहे. दर वर्षी नवीन नोंदणी करावी लागते.
- कत्तलखान्याची एफएसएसएअाय फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ॲथोरिटी अाॅफ इंडियामार्फत नियमित तपासणी केली जाते. ज्यामध्ये स्वच्छता, नोंदी, जनावराची कापणी अगोदर व कापल्यानंतर गुणवत्ता, कामगार, प्रयोगशाळा या गोष्टीची तपासणी केली जाते.
- भारताच्या निर्यात नियमानुसार निर्यातक्षम मटणाच्या विविध सूक्ष्मजीवाणूंसाठीच्या चाचण्यांसोबतच इतर काही चाचण्या घेतल्या जातात. निर्यातीअगोदर शासनाच्या पशुवैद्यकाकडून मटणाच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते.
- प्रत्येक निर्यातीच्या मटणाबरोबर कापलेल्या जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र देणे अनिवार्य असते. ज्यामध्ये ती जनावरे आयात करणाऱ्या देशांच्या मागणीनुसार काही विशिष्ट रोगांपासून मुक्त असणे अनिवार्य असते तरच मटणाची त्या देशात निर्यात होऊ शकते.
- निर्यात केले जाणारे मटण हे शासनाने प्रमाणित केलेल्या कत्तलखान्यात कापलेले असणे आवश्यक असते.
- शासनाने अपेडा मार्फत प्रमाणित केलेल्या कत्तलखान्याची संख्या अाणि वेगवेगळ्या शेती व शेतीपूरक मालाची निर्यात करणाऱ्या नोंदणीकृत लोकांची अपेडाच्या संकेतस्थळावर यादी दिलेली आहे.
ग्राफिक्स -
ग्राफिकसाठी कॉपी पाहावी
मटणाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक
ग्राफिक्ससाठी माहिती -
मटणाची गुणवत्ता ठरविणारे घटक
अाहार
वंशावळ
वातावरण
कापण्याच्या वेळी वजन
वाहतूक पद्धत
अारोग्य
जनावराची हाताळणी
कापण्याअागोदर ठेवलेल्या ठिकाणची स्थिती
कापण्याअगोदर कोंडून ठेवलेला वेळ
कापण्याच्या अगोदरची हाताळणी
कापण्याची पद्धत
कापण्यानंतरची हाताळणी
जनावराचे वय
शिजविण्याची पद्धत
गोठ्यातील वातावरण
निर्यातीसाठी लागणाऱ्या बोकडाच्या मटणाचे वेगवेगळे काप.
येथे फोटो घ्यावा. (फोटो m११८७६)
मटण उद्योग वाढविण्यासाठी आवश्यक बाबी
- मटणाच्या स्वच्छ निर्मितीचे महत्त्व व जागरूकता
- मटणाची गुणवत्ता ठरविणाऱ्या प्रयोगशाळांची निर्मिती व योग्य जडणघडण
- नोंदणीकृत कत्तलखाण्याची संख्या वाढविण्याची गरज
- कुशल मजुरांसाठी प्रशिक्षणाची गरज
- कत्तलखान्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी तपासणी यंत्रणा आणखी विकसित करणे
- योग्य जनावरांची कत्तलीसाठी निवड व त्यांचे योग्य संगोपन
- मटणाच्या चांगल्या गुणवत्तेसाठीचे नियम व गुणवत्ता मटण आयात करणाऱ्या देशाशी मिळतीजुळती असणे.
संपर्क - डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५.
(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)
कृपया वर दिलेली माहिती आपल्या फेसबुक वर, फेसबुक पेज आणि ग्रुपवर तसेच व्हाट्स अँप ग्रुप वर शेअर करावी, हि माहिती जरी तुमच्या उपयोगी नसेल तरी ती तुमच्या मित्राच्या उपयोगी पडू शकते. खाली दिलेली लिंक वर क्लिक करून आपला शेळीपालन ग्रुप जॉईन करता येईल.

0 comments:
Post a Comment