अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा बियाने मीळेल

अल्पावधीत उत्पन्न देणारा शेवगा बियाने मीळेल
***********
शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर,आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते. भारतात तामिळनाडू, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते.
महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे.
शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते.
आम्ही मागील तीन वर्षा पासून बिजोत्पादन करतो.पीकेएम१ आणी पीकेएम२ या पेक्षा चांगली ओडीसी वेरॉयटी आहे. या मधूनही आम्ही एक महीना पहीले येणारी आणी जास्त शेंगा येणारी ओडीसी शेवगा बीयाने तयार करतो आता पर्यत सर्व शेतकरी समाधानी आहेत.
बियाने साठी संम्पर्क करा.
खुशाल सिताराम चव्हाण (शेवगा बिजोत्पादन शेतकरी)
पुसद,जी यवतमाळ
9764112400
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment